नात्यांमधील संवेदनशीलता संपत चालल्याचेच हे लक्षण !
पांढरकवडा (यवतमाळ), २० जुलै (वार्ता.) – तालुक्यातील दातपाडी या गावातील सौ. मोनिका गणेश पवार हिने मुलीला जन्म दिल्याप्रकरणी जाळून बाळंतिणीला मारण्यात आले. याविषयी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. मुलीला जन्म दिल्याने नणंद कांता राठोड हिने वहिनीसमवेत वाद घातला आणि तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळले. त्यात ती ८० टक्के जळली. सेवाग्राम येथे उपचार घेत असतांनाच तिचा मृत्यू झाला.