मिरज, १८ जुलै – मिरज विद्या समितीच्या विद्यामंदिर प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा १० वीचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेतील एकूण प्रवेशित ४६२ विद्यार्थ्यांपैकी ८३ विद्यार्थी विशेष योग्यता प्राप्त, १५८ प्रथम श्रेणी, तर २२१ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालाने कोरोना काळातही वर्षभर ५ वी ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी सातत्याने ऑनलाईन पद्धतीने अध्यापन, विविध उपक्रम राबवले. चालू शैक्षणिक वर्षातही संस्थेने विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत.
या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. शैलेश देशपांडे, कार्यवाह श्री. अनिलभाऊ कुलकर्णी यांच्यासह मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.