पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही !
|

थिरूवनंतपूरम् – रात्री ९ वाजल्यानंतर बाहेर पडणार्या महिला या वेश्या असून त्यांना ठार मारले पाहिजे, असा फतवा केरळमधील एक २७ वर्षीय ‘इस्लामी विद्वान’ सलीह बथेरी याने काढला. या संदर्भात त्याने एक ‘व्हिडिओ’ प्रसारित केला आहे.
‘Women who go out after 9 pm are prostitutes, they deserve to be raped’: Kerala’s Islamic cleric Swalih Batheryhttps://t.co/LJGezCZjyh
— OpIndia.com (@OpIndia_com) July 16, 2021
केरळमध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या एका बलात्काराच्या घटनेत गोविंदचामी याला शिक्षा ठोठावण्यात आली होती. सलीह याने प्रसारित केलेल्या त्याच्या व्हिडिओमध्ये बलात्कारी गोविंदाचामी याला योग्य ठरवले आहे. सलीह याने पुढे म्हटले आहे की, गोविंदाचामी याने एका युवतीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. त्या वेळी गोविंदाचामी यानेही ‘सदर युवती रात्री एकटी प्रवास करत होती आणि रात्री प्रवास करणारी प्रत्येक युवती ही वेश्याच असते’, असे म्हटले होते. या वेळी सलीह याने गोविंदाचामी प्रकरणाची सुनावणी करणार्या न्यायाधिशांवरही टीका केली. या प्रकरणी पोलिसांनी सलीह याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. (साम्यवादी पक्ष सत्तेवर असलेल्या राज्यात पोलिसांनी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केल्यास आश्चर्य ते काय ? – संपादक)
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !
३ अल्पवयीन मुलांसह ३५ जणांची साक्ष !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !