आरोपी मोहन नायक यांच्या जामिनावर पूर्वीच्या आदेशावरून प्रभावित न होता निर्णय घ्या !

  • गौरी लंकेश यांच्या हत्येचे प्रकरण

  • सर्वोच्च न्यायालयाचे कर्नाटक उच्च न्यायालयाला निर्देश !

नवी देहली – बेंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणातील ६ वे आरोपी मोहन नायक यांच्यावरील ‘ककोका’ गुन्हा रहित करण्याचा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता. त्याला गौरी लंकेश यांची बहीण कविता लंकेश यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने नायक यांच्या जामिनावर गुन्हा रहित केल्याच्या निकालामुळे प्रभावित न होता निर्णय घ्यावा, असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाला दिला आहे. तसेच या आव्हान याचिकेवर उत्तर देण्याचा आदेश कर्नाटक शासनाला दिला आहे. मोहन नायक यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप २२ एप्रिल या दिवशी झालेल्या सुनावणीत कर्नाटक उच्च न्यायालयाने रहित केले होते. त्यामुळे नायक यांनी जामीन देण्याची याचिका प्रविष्ट केली होती.