चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला हे ‘सत्यनारायण की कथा’ या नावाने प्रेमकथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार !

  • साजिद नाडियाडवाला हे प्रेमकथेवर आधारित चित्रपटाला स्वतःच्या श्रद्धास्थानाचे नाव देण्याचे धाडस दाखवले असते का ? हिंदू सहिष्णु असल्यामुळेच ऊठसूठ कुणीही उठतो आणि हिंदु धर्म, धर्मग्रंथ, संत, महापुरुष यांचे विडंबन करतो. हिंदूंनी आतातरी जागरूक होऊन स्वतःच्या श्रद्धास्थानांचे विडंबन वैध मार्गाने रोखावे !
  • आतापर्यंत ‘द लव्ह गुरु’, रासलीला’, ‘केदारनाथ’ अशा हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या नावांचा वापर करून निर्मिलेल्या अनेक चित्रपटांमधून हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्यात आल्या आहेत, हे लक्षात घ्या !
  • ‘केंद्रीय चित्रपट परीनिरिक्षण मंडळा’ने या चित्रपटाला अनुमती नाकारून १०० कोटी हिंदूंच्या धर्मभावना जपाव्यात, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
  • या देशात बहुसंख्यांकांकडून अल्पसंख्यांकांच्या श्रद्धास्थानांचे जर चुकून विडंबन झाले, तर तो घोर अपराध असतो, तर अल्पसंख्यांकांकडून बहुसंख्यांकांच्या श्रद्धास्थानांचे विडंबन झाल्यावर ते व्यक्तीस्वातंत्र्य असते ! हे चित्र पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला हे प्रेमकथेवर आधारित ‘सत्यनारायण की कथा’ नावाच्या एका हिंदी चित्रपटाची निर्मित करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विध्वंस हे करणार असून वर्ष २०२२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचा फलक (पोस्टर) नुकताच समोर आला आहे.

या चित्रपटात काम करणारे अभिनेते कार्तिक आर्यन यांनी या चित्रपटात प्रेमकथा असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप चालू करण्यात आलेले नाही.

या चित्रपटामध्ये नेमके काय आहे, हे जरी अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी ‘एका प्रेमकथेवर आधारित चित्रपटाला हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीसत्यनारायणाचे नाव का ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.