चीनच्या विरोधात अमेरिकेत २० अब्ज डॉलरचा खटला प्रविष्ट

चीनच्या विरोधात अमेरिकेत २० अब्ज डॉलरचा खटला प्रविष्ट

बिहार सरकार प्रत्येक कुटुंबाला १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार

कोरोनामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आल्याने मजुरी करणार्‍यांचा आणि काम गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना बिहार सरकार प्रत्येकी १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसाठी अमेरिकेत तंबू आणि ट्रक यांमध्ये वातानुकूलित शवागार बनवण्याची सिद्धता

कोरोनामुळे अमेरिकेत प्रतिदिन रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. न्यूयॉर्क शहरात ३० सहस्रांहून अधिक जणांना याची बाधा झाली आहे.

आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर १४ एप्रिलपर्यंत बंदी

केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत देशभरात दळणवळण बंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवरही १४ एप्रिलपर्यंत बंदी घातली आहे. यापूर्वी ही बंदी ३१ मार्चपर्यंत घालण्यात आली होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. केवळ मालवाहू विमानांचे उड्डाण चालू ठेवले जाणार आहे.

‘कोरोना’ म्हणजे ‘कोई रोडपर ना निकले’

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च या दिवशी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सामाजिक माध्यमांतून कोरोनाविषयी योग्य प्रबोधन करणार्‍यांचा उल्लेख केला होता. यामध्ये त्यांना आवडलेला फलक म्हणजे ‘को – कोई, रो – रोडपर, ना – ना निकले’, अशाप्रकारे कोरोनाचा अर्थ दर्शवणारा होता.

अमेरिकेत शीख समाजाने ३० सहस्र वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी सिद्ध केले लंगर (अन्नदान)

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अनेक वैद्यकीय कर्मचारी रात्रं-दिवस झटत आहेत. अशा कर्मचार्‍यांना साहाय्य म्हणून आणि खाण्या-पिण्याची सोय व्हावी, यासाठी शीख समाजाने ३० सहस्र वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी लंगर (अन्नदान) म्हणून खाद्यपदार्थांची पाकिटे सिद्ध केली आहेत.

मिझोराममध्ये मांसासाठी होणार्‍या कुत्र्याच्या कत्तलीवर बंदी

मिझोराम राज्याने कुत्र्याच्या मांसाचा व्यापार बंद करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. कत्तलीसाठी उपयुक्त जनावरांच्या परिभाषेतून कुत्र्यांना काढून टाकण्यासाठी कायद्यात पालट केला आहे

बांगलादेशमध्ये बाँबस्फोट करणार्‍या धर्मांधास ठाणे येथे अटक

बांगलादेशमधील आरोपी भारतात कोणत्या मार्गे आला, याची शासनाने कसून चौकशी करून त्याला कडक शिक्षा करायला हवी !

काश्मीरमध्ये ६ आतंकवाद्यांना अटक

लष्कर ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेने  पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या साहाय्याने ‘द रजिस्टेंस फ्रंट जम्मू-कश्मीर’ नावाची नवी जिहादी आतंकवादी संघटना बनवली आहे. या संघटनेच्या ६ आतंकवाद्यांना पोलिसांंनी अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.

ओडिशा राज्याच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना ४ मासांचे वेतन आगाऊ मिळणार

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार्‍या आणि कोरोनाला रोखण्यासाठी सैनिकांप्रमाणे प्रयत्न करणार्‍या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांसाठी महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे.