न्यूयॉर्क – अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अनेक वैद्यकीय कर्मचारी रात्रं-दिवस झटत आहेत. अशा कर्मचार्यांना साहाय्य म्हणून आणि खाण्या-पिण्याची सोय व्हावी, यासाठी शीख समाजाने ३० सहस्र वैद्यकीय कर्मचार्यांसाठी लंगर (अन्नदान) म्हणून खाद्यपदार्थांची पाकिटे सिद्ध केली आहेत. या खाद्यपदार्थांची पाकिटे पॅक करण्यासाठी शीख समुदायाने न्यूयॉर्कच्या महापौरांकडे संपर्क साधून नागरिकांना साहाय्य करण्याचे आवाहन केले होते. महापौरांनी संमती दिल्यानंतर गेले २ दिवस कर्मचार्यांना खाद्यपदार्थांची पाकिटे दिली जात आहेत, अशी माहिती ‘युनायटेड शीख’ या ‘ट्विटर’ खात्यावरून दिली आहे.