ओडिशा राज्याच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना ४ मासांचे वेतन आगाऊ मिळणार

भुवनेश्‍वर – ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार्‍या आणि कोरोनाला रोखण्यासाठी सैनिकांप्रमाणे प्रयत्न करणार्‍या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांसाठी महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे. यानुसार पटनायक यांनी आरोग्य विभागाशी संबंधित सर्वच कर्मचारी आणि कामगार यांना पुढील ४ मासांचे वेतन आगाऊ स्वरूपात देण्यास संमती दिली आहे. त्यामुळे या सर्वांना ४ मासांचे वेतन आताच मिळणार आहे. हा निर्णय ‘आरोग्य क्षेत्रात सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांचे मनोबल आणि धैर्य वाढवणारा आहे’, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.