चीनच्या विरोधात अमेरिकेत २० अब्ज डॉलरचा खटला प्रविष्ट

कोरोेनाचा ‘जैविक शस्त्र’ म्हणून वापर केल्याचा आरोप

नवी देहली – कोरोनाचा ‘जैविक शस्त्र’ म्हणून जागतिक स्तरावर वापर केल्याचा आरोप करत अमेरिकेतील अधिवक्ता लॅरी केलमेन यांनी चीनच्या विरोधात तब्बल २० अब्ज डॉलरचा खटला प्रविष्ट केला आहे. त्यांनी चीनवर जगातील साडेतीन लाख लोकांना या विषाणूद्वारे रुग्ण बनवल्याचा आरोप केला आहे. चीनने अमेरिकी कायदे, आंतरराष्ट्रीय कायदे आणि अन्य करारांचे उल्लंघन केल्याचा दावाही या आरोपात करण्यात आला आहे. टेक्सास येथील उत्तर जिल्हा न्यायालयात हा खटला प्रविष्ट करण्यात आला आहे.