आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर १४ एप्रिलपर्यंत बंदी

नवी देहली – केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत देशभरात दळणवळण बंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवरही १४ एप्रिलपर्यंत बंदी घातली आहे. यापूर्वी ही बंदी ३१ मार्चपर्यंत घालण्यात आली होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. केवळ मालवाहू विमानांचे उड्डाण चालू ठेवले जाणार आहे. देशांतर्गत विमान वाहतूक यापूर्वीच बंद करण्यात आली आहे. भारतात कोरोनाचे रुग्ण हे बहुतांश विदेशांतूनच आलेले आहेत.