काश्मीरमध्ये ६ आतंकवाद्यांना अटक

कुपवाडा (जम्मू-काश्मीर) – लष्कर ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेने  पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या साहाय्याने ‘द रजिस्टेंस फ्रंट जम्मू-कश्मीर’ (टी.आर्.एफ्.जे.के) नावाची नवी जिहादी आतंकवादी संघटना बनवली आहे. या संघटनेच्या एहतिशाम फारूख मलिक, शफकत अली टागू, मुसैब हसन बट, निसार अहमद गनई, कबीर अहमद लोन आणि शराफत या ६ आतंकवाद्यांना पोलिसांंनी अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.

या आतंकवाद्यांना काही लोकांच्या हत्या करण्यास आणि सुरक्षादलांवर आक्रमण करण्यास तोयबाकडून सांगण्यात आले होते. तसेच नवीन तरुणांना यात सहभागी करून घेण्यासही सांगण्यात आले होते. हे तरुण सामाजिक माध्यमांद्वारे पाकमधील आतंकवाद्यांच्या संपर्कात होते.