ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन ‘स्ट्रेन’च्या संक्रमणाविषयी ही सूत्रे लक्षात घ्या !

१. ब्रिटन हा आयुर्वेदानुसार ‘आनूप देश’ आहे. अशा ठिकाणी कफाचा प्रभाव आधिक्याने दिसतो. स्वाभाविकपणे कफाशी संबंधित विकार प्रबळ होतात. (आपल्याकडे गोवा, केरळ, बंगाल ही आनूप देशाची काही प्रमुख उदाहरणे)…

तत्त्वज्ञानाचे सार – गीता

गीता हे सर्व उपनिषदांचे सार आहे. जे ज्ञान आणि ईश्‍वरप्राप्तीची जी जी साधने उपनिषदांनी सांगितली आहेत, ती अत्यंत सुलभतेने भगवान श्रीकृष्णाने सरळ अंतःकरणाच्या साधकांना साररूपात उपलब्ध करून दिली आहेत

हे बंगाल सरकारला लज्जास्पद !

सर्वोच्च न्यायालयात पुनीत कौर ढांडा यांनी याचिका प्रविष्ट करून बंगालच्या मुसलमानबहुल मालदा, उत्तर दिनाजपूर, मुर्शिदाबाद, नादिया, कूचबिहार, कोलकाता, उत्तर २४ परगणा आणि दक्षिण परगणा या भागांत हिंदूंना मतदान करू दिले जात नाही, असे म्हटले आहे.

एका राज्यात पोलिसांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याची चौकशी !

धर्मप्रसार करणार्‍या संघटनेच्या कार्यकर्त्याची चौकशी करणार्‍या पोलिसांनी जर धर्मांधांची अशा प्रकारे कसून चौकशी केली असती, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता ! 

कोरोनाच्या संसर्गाच्या कारणामुळे एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी अनुमती नाकारली

केवळ कोरोनामुळेच नव्हे, तर यापूर्वी एल्गार परिषदेनंतरचा हिंसक इतिहास सर्वश्रुत असल्याने तिला कधीच अनुमती द्यायला नको, असेच जनतेला वाटते !

श्री महालक्ष्मीदेवीच्या खजिन्यात ६४ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची भर !

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या खजिन्यात आता आणखी ६४ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची भर पडली आहे. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० पर्यंत देवीला अर्पण झालेल्या दागिन्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

राज ठाकरे आणि मनसेचे पदाधिकारी यांना दिंडोशी न्यायालयाकडून नोटीस

अ‍ॅमेझॉन’च्या ‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा उपयोग करावा, याविषयी मनसेने दिलेल्या चेतावणीवरून ‘अ‍ॅमेझॉन’ने न्यायालयात धाव घेतली

नागरिकांना संकटाची जाणीव करून देणे आवश्यक असल्यामुळे रात्रीची संचारबंदी ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू केल्यामुळे काही जणांकडून टीका केली जात आहे; मात्र जनतेला बंधन आणि संकट यांची जाणीव करून देणे आवश्यक आहे. त्यामुळेच रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

तेरवाड (जिल्हा कोल्हापूर) बंधार्‍यावर सहस्रो मासे मृतावस्थेत आढळल्याने नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना बांधून ठेवले

इचलकरंजी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश