नागरिकांना संकटाची जाणीव करून देणे आवश्यक असल्यामुळे रात्रीची संचारबंदी ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई – महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू केल्यामुळे काही जणांकडून टीका केली जात आहे; मात्र जनतेला बंधन आणि संकट यांची जाणीव करून देणे आवश्यक आहे. त्यामुळेच रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. २४ डिसेंबर या दिवशी कोरोनाच्या कालावधीमध्ये वृत्तसंकलन करणार्‍या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींचा मुख्यमंत्र्यांकडून ‘कोविड योद्धा’ म्हणून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मधल्या काळात समाजात मानसिक आरोग्याचा प्रश्‍नही भेडसावत असल्याचे दिसून आले. माझ्यावरही प्रचंड दडपण होते; पण लढण्याविना पर्याय नाही.