एका राज्यात पोलिसांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याची चौकशी !

धर्मप्रसार करणार्‍या संघटनेच्या कार्यकर्त्याची चौकशी करणार्‍या पोलिसांनी जर धर्मांधांची अशा प्रकारे कसून चौकशी केली असती, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता ! 

एका जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍याने हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक यांची चौकशी केली आणि विविध प्रश्‍न विचारून माहिती घेतली. त्याविषयी झालेले संभाषण खालील प्रमाणे आहे.

पोलीस अधिकारी : समितीच्या जिल्हा आणि तालुका स्तरांवर चालू असलेल्या कार्याची माहिती द्या. तुमच्या कार्यकारिणीची माहिती द्या.

कार्यकर्ते : समितीचे जिल्ह्यातील कार्य खूप मोठे नसून तालुका स्तरावर अशी कुठलीही कार्यकारिणी नाही. हिंदु जनजागृती समिती मुळात एक धर्मप्रसार करण्याचे व्यासपीठ आहे. सर्व हिंदुत्वनिष्ठ एकत्रित येऊन एखादा उपक्रम ठरवतात. सर्व मिळून प्रयत्न करतात.

पोलीस अधिकारी : तुमची सखोल माहिती द्या. या माहितीच्या अंतर्गत बरीच सूत्रे आहेत.

कार्यकर्ता : आतापर्यंत इतकी सखोल माहिती कुणी मागितली नाही. मला आमच्या अधिवक्त्यांशी याविषयी बोलून घ्यावे लागेल.

पोलीस अधिकारी : तुमचे कार्य आम्हाला ठाऊक आहे. तुमची संघटना काही आतंकवादी संघटना नाही. आम्हाला माहिती ‘अपडेट’ करावी लागते. त्यासाठी माहिती मागत आहे. आम्ही काही तुम्हाला उचलून (अटक) नेणार नाही.

कार्यकर्ता : मी चर्चा करून कळवतो.

(पोलीस अधिकार्‍याने दुपारी भ्रमणभाषवर ‘मेसेज’ करून माहिती मागवली, तसेच दुपारी परत दूरभाष केला. या पोलीस अधिकार्‍याने अन्य एका कार्यकर्त्यालाही दूरभाष करून समितीविषयी माहिती मागितली. त्यावर त्या कार्यकर्त्याने ‘मला ठाऊक नाही. संबंधित कार्यकर्ते माहिती देतील’, असे सांगितले.)

रात्री कार्यकर्त्याने दूरभाष केल्यावर त्यांच्यात खालील प्रमाणे संभाषण झाले !

कार्यकर्ते : तुम्ही पाठवलेल्या सूत्रांपैकी बरीच सूत्रे ही माझ्या वैयक्तिक माहितीच्या संदर्भात आहेत. ती मी तुम्हाला देऊ शकत नाही. केवळ माझे नाव आणि भ्रमणभाष क्रमांक तुम्ही घेऊ शकता.

पोलीस अधिकारी : आपण फेसबूकवर तर माहिती देतोच ना. आमच्याकडून तुमच्या माहितीचा काही अपवापर होणार नाही. किमान तुमचे शिक्षण वगैरे माहिती तरी द्या.

कार्यकर्ते : सध्या नाव आणि भ्रमणभाष क्रमांक तेवढे घ्या. उर्वरित बघूया.

पोलीस अधिकारी : ठीक आहे.