आगामी विधानसभा निवडणुकीत मगो भाजपशी युती करणार नाही !

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपशी युती करण्याची शक्यता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष श्री. दीपक ढवळीकर यांनी नाकारली आहे.

मगो पक्षाच्या अध्यक्षपदासाठी जानेवारी २०२१ मध्ये निवडणूक

जानेवारी २०२१ मध्ये पक्षाचे अध्यक्षपद आणि समितीचे इतर सदस्य यांसाठीची निवडणूक घेण्यात येईल, अशी माहिती मगो पक्षाचे अध्यक्ष श्री. दीपक ढवळीकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘निवडणुकीसाठी कार्यक्रम ठरवण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार घोषित

कै. अरविंद शिरसाट यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यावर्षी दोडामार्गमधील तेजस देसाई यांना जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार घोषित झाला आहे.

गोव्यात नवीन ९० कोरोनाबाधित

गोव्यात २४ डिसेंबरला ९० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनामुळे दिवसभरात १ मृत्यू झाला आहे, तर ८८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंतचे एकूण मृत्यू ७२८ झाले आहेत.

संधीसाधू काँग्रेस !

एवीतेवी लोकशाहीचा टेंभा मिरवणारी काँग्रेस स्वतःचा स्वार्थ साधतांना नेहमीच लोकशाहीचा गळा घोटते, हाही इतिहास आहे. कृषी कायद्याचेच पहायचे झाले, तर हा कायदा लोकशाही मार्गाने सार्वभौम संसदेने संमत केला. तरीही काँग्रेस यास विरोध करून एक प्रकारे लोकशाहीचा अवमानच करत नाही का ?

देहली विमानतळावरून खलिस्तानी आतंकवाद्याला अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) गेल्या काही वर्षांपासून पसार असणार्‍या खलिस्तानी आतंकवादी गुरजीतसिंह निज्जर याला देहली विमानतळावरून अटक केली. वर्ष २०१७ मध्ये निज्जर सायप्रस या देशामध्ये पळून गेला होता.

गीता असे समस्त वेदांचा सार, गीता असे दिव्य ज्ञानाचे भांडार !

गीतेमुळे जीवनाचे ध्येय सुस्पष्ट होते । ज्ञानाच्या तेजासह भक्तीचे अमृतही लाभते ॥
विविध योगमार्गांचे महत्त्व कळते । आणि जिवाची मोक्षाकडे वाटचाल होते ॥

ब्रिटनहून आलेले ५ कोरोनाबाधित प्रवासी विमानतळावरून पसार

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू सापडल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भारतासह अनेक देशांनी ब्रिटनसमवेतची विमान वाहतूक स्थगित केली आहे. त्यापूर्वी ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांपैकी ५ कोरोना पॉझिटिव्ह (सकारात्मक) रुग्णांनी देहली विमानतळावरूनच पलायन केल्याची घटना घडली.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचा वाढता संसर्ग

ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना विषाणू आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिथे दळणवळण बंदी अधिक कडक करण्यात आली आहे. हा ‘स्ट्रेन’ (विषाणू) नियंत्रणाबाहेर असल्याचे तेथील प्रशासनाचे म्हणणे आहे. यामुळे युरोपीय देश सतर्क झाले आहेत.

श्रीमद्भगवद्गीतेतील अध्यायांचे पठण केल्याने होणारे लाभ

गीतेच्या उपदेशाचे महत्त्व अखिल मानवजातीसाठी आहे; कारण गीतेने जगण्याची कला शिकवली आहे. गीता आम्हाला जगायला शिकवते. आत्म्याचे एकतत्त्व गीताशास्त्रात सांगितले आहे आणि ते सर्वांनी जाणून घेणे योग्य आहे