कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या खजिन्यात आता आणखी ६४ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची भर पडली आहे. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० पर्यंत देवीला अर्पण झालेल्या दागिन्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबईचे प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पुरुषोत्तम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शकपणे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने ही प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे समितीचे अध्यक्ष श्री. महेश जाधव आणि सचिव श्री. विजय पोवार यांनी सांगितले.
दख्खनचा राजा जोतिबाला २७६ ग्रॅमचे ९ लाख २० सहस्र किमतीचे सोन्याचे, तर ७ सहस्र ७५२ ग्रॅम वजनाचे २ लाख ८५ सहस्र ७८२ किमतीचे चांदीचे दागिने भाविकांनी अर्पण केले. सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम दर ३३ सहस्र ३०० रुपये, तर चांदीचा दर प्रतिकिलो दर ३९ सहस्र ५०० रुपये यांप्रमाणे मूल्यांकन करण्यात आले. या वेळी समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर, सदस्य सर्वश्री शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, चारुदत्त देसाई, राजाराम गरुड उपस्थित होते.