शरजील उस्मानी याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजेत ! – नीलेश राणे

शरजील उस्मानी याने पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये हिंदु समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावर निलेश राणे यांनी टीका केली आहे.

यवतमाळ येथे खोटे दस्तऐवज सिद्ध करून शेतीची परस्पर विक्री

तालुक्यातील बोर्डा येथील मारोती वाभीटकर यांच्या नावे असलेल्या शेतीची खोटे दस्तऐवज सिद्ध करून परस्पर विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे या दस्तऐवजाला प्रभारी दुय्यम निबंधक जी.टी. रणमले यांनी मान्यता दिली.

पॉर्न स्टार मिया खलिफा आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांचाही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

अमेरिकेत होणारा वर्णद्वेषी अत्याचार, काश्मीरमध्ये हिंदूंचा झालेला वंशसंहार, पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचार यांवर हे ‘मान्यवर’ तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे ‘मुंबई पब्लिक स्कूल’ असे नामकरण करणार !

मराठी शाळांना इंग्रजी नाव दिल्याने आधुनिक झाल्यासारखे वाटते का ? इंग्रजी नाव देऊन शिक्षणाचा दर्जा सुधारणार, असे वाटते का ? हे सर्व अतिशय हास्यास्पद आणि मराठीचा उद्घोष करणार्‍यांसाठी लाजिरवाणे आहे !

पुण्यातील लाल महाल पर्यटकांसाठी खुला, शिवप्रेमी आनंदित

शिवप्रेमींकडून सातत्याने होत असलेली मागणी लक्षात घेऊन अखेर ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा २ फेब्रुवारीपासून महापालिका प्रशासनाकडून लाल महाल नागरिकांसाठी उघडण्यात आला आहे. इतिहासाची साक्ष असलेला लाल महाल उघडण्यात आल्याने शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. 

मुंबईतील लोकलगाड्यांच्या वेळा पालटणार – राजेश टोपे 

प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबईतील उपनगरीय लोकल सेवेच्या वेळेत पालट करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सर्वांसाठी लोकलगाड्यांची सुविधा चालू झाली; मात्र वेळेची मर्यादा घालण्यात आल्याने नोकरदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रायगडाच्या पायरी मार्गावरील तिकीटघर शिवप्रेमींनी उलथून टाकले !

दुर्गदुर्गेश्‍वर रायगडावर जाण्यासाठी पुरातत्व खात्याने माणसी २५ रुपये आकारले जात होते. प्रत्यक्षात गडावर कोणत्याही प्रकारच्या सुविधा न देता अशी आकारणी अन्यायकारक असून याचा निषेध म्हणून काही शिवप्रेमींनी ते तिकीटघर उलथवून टाकले.

सौंदत्तीचे रेणुका मंदिर ११ मासांनंतर भाविकांसाठी खुले

सौंदत्ती डोंगरावर प्रतिवर्षीप्रमाणे शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने २२ जानेवारी या दिवसापासून ९ फेब्रुवारीपर्यंत यात्रा चालणार होती; परंतु ३१ जानेवारीपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे यात्रा रहित करण्यात आली होती. 

नागपूर येथील हुतात्मा सैनिक भूषण सतई यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांचे साहाय्य

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने येथील हुतात्मा सैनिक भूषण सतई यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांचे साहाय्य शासनाच्या वतीने देण्यात आले. २ मासांपूर्वी काश्मीर खोर्‍यात झालेल्या आक्रमणात भूषण सतई हुतात्मा झाले होते.

वर्धा येथे पोलाद प्रकल्पात स्फोट होऊन २८ कामगार आणि ३ अभियंते भाजले !

प्रकल्पात दुरुस्तीची कामे चालू आहेत. कारखान्यातील ‘ब्लास्ट फर्निश’चा स्फोट झाल्याने त्यातून निघालेल्या गरम वाफेमुळे ३ अभियंते आणि २८ कामगार भाजले गेले आहेत.