आतंकवाद्याला पोलिसांनी केले ठार
तेल अविव (इस्रायल) – येथे २१ जानेवारीच्या संध्याकाळी झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ जणांवर चाकूने वार करण्यात आले. यात ते घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी आतंकवाद्याला गोळ्या घालून ठार केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आक्रमण करणार्याने नाहलत बिन्यामिन मार्गावर ३ जणांवर चाकूने वार केले. त्याने जवळच्या ग्रुझेनबर्ग मार्गावर चौथ्या व्यक्तीवर चाकूने वार करून त्याला घायाळ केले. यानंतर आक्रमणकर्त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. तो १८ जानेवारीला पर्यटक व्हिसावर इस्रायलमध्ये आला होता. त्याच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या ओळखपत्रावरून त्याची ओळख अब्देल अझीझ कद्दादी म्हणून झाली आहे. तो मोरोक्कोचा नागरिक होता आणि त्याच्याकडे अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासह ग्रीन कार्ड होते. काही दिवसांपूर्वी कद्दी इस्रायलमध्ये आला तेव्हा सुरक्षा कर्मचार्यांनी त्याला रोखले होते; पण तरीही त्याला आत जाण्याची अनुमती देण्यात आली होती.