Jogeshwari Stone Pelting On Police : अनधिकृत झोपडपट्टीच्या विरोधात कारवाई केल्याने पोलिसांवर दगडफेक !

जोगेश्‍वरी (मुंबई) येथील घटना

मुंबई – जोगेश्‍वरीमध्ये अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई करत असतांना  झोपडपट्टीधारकांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन चालू केले. त्यानंतर आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीमध्ये ५ पोलीस अधिकारी घायाळ झाले. त्यानंतर पोलिसांनी २० ते २५ जणांना कह्यात घेतले.

२२ जानेवारीच्या सकाळी ११ वाजता ही घटना घडली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी स्थानिकांना कह्यात घेतल्यावर काही वेळ गोंधळाचे वातावरण होते. रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच ‘अनधिकृत बांधकाम’ हटवण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या.

संपादकीय भूमिका

  • मुळात मुंबईच्या सर्वच उपनगरीय रेल्वेस्थानकांच्या बाहेर अनधिकृत झोपडपट्ट्या आतापर्यंत का वाढू दिल्या गेल्या ? त्यामुळे याच्याशी संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक नेते यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे !
  • अनधिकृत झोपडपट्टीवाल्यांनी केवळ रेल्वेची भूमीच बळकावलेली नाही, तर चोर्‍या करणे, तसेच दगड, फुगे मारून लोकांना गंभीर घायाळ करणे आदींमुळे हे झोपडपट्टीधारक मुंबईकरांसाठी मोठी डोकेदुखी बनले आहेत. पोलिसांवरही आक्रमण करण्याची त्यांची मजल गेली आहे. या झोपडपट्ट्यांतून किती बांगलादेशी घुसखोर निघतील ? याचा विचारच न केलेला बरा !