प्रयागराज कुंभपर्व २०२५
|
श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज
प्रयागराज (उत्तरप्रदेश) : येथे सनातन संस्था आयोजित धर्मशिक्षण प्रदर्शनाला कुंभपर्वातील श्रद्धाळू, भाविक, संत-महंत यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. असेच प्रदर्शन आमच्या भागात लावावे, असे संत आणि अनेक जिज्ञासू यांनी मागणी केली आहे. प्रदर्शन पाहून सनातनच्या धर्मकार्यात सहभागी होण्याची अनेक जिज्ञासूंनी सिद्धता दर्शवली. ११ जानेवारीपासून या प्रदर्शनाला प्रारंभ झाला आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते २१ जानेवारीपर्यंत सहस्रो जिज्ञासूंनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
आचारधर्म, साधना, तीर्थक्षेत्र महिमा, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य, विविध भाषांतील ग्रंथसंपदा, सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने या प्रदर्शनात आहेत. ‘सनातन धर्म म्हणजे काय ?’, ‘धर्माचरण कसे करावे ?’, ‘धार्मिक कृती श्रद्धेने आणि योग्य प्रकारे केली गेली, तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक होतो !’, तसेच भारत स्वाभाविक हिंदु राष्ट्र आहे. सनातन धर्मियांची हिंदु राष्ट्राची कल्पना विश्वकल्याणासाठी आहे आदी माहिती देणारे फलक या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत.
‘सनातन संस्कृति एवं ग्रंथ प्रदर्शनी’ की जानकारी शांभवी पीठाधीश्वर एवं काली सेना के संस्थापक स्वामी आनंदस्वरूपजी महाराज को देते हुए
सनातन संस्था के प्रवक्ता @1chetanrajhans जी।
कुम्भ क्षेत्रमें गंगेश्वर महादेव मार्ग (sec-9) कलश द्वारके निकट, यह प्रदर्शनी श्रद्धालु केलिए खुली है। pic.twitter.com/Zl6bj6YRpQ— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) January 17, 2025

Sanatan Sanstha Pressnote !
Date: 15.01.2025
A Unique Opportunity to Understand Sanatan Dharma in Simple Language at the Kumbh Mela. #KumbhMela2025
Prayagraj: The ‘Sanatan Culture Exhibition’ aimed at explaining the scientific and spiritual basis of Sanatan Dharma, culture,… pic.twitter.com/eXdAcrt7Kj
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) January 15, 2025

#KumbhMela2025
प्रयागराज कुंभ मेले में सनातन संस्था की प्रदर्शनी का लाभ लेते हुए जिज्ञासु !
🔅 धर्मशिक्षा प्रदर्शनी से हिन्दू जीवनशैली सीखें, सनातन धर्म को समझें !
सनातन संस्था का यह शिविर आपको आध्यात्मिक उन्नति, शांति और ज्ञान की ओर मार्गदर्शन करेगा। हम आपके स्वागत के लिए तत्पर… pic.twitter.com/p05PFLpaCR— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) January 16, 2025
सनातनचे प्रदर्शन पहाणार्या जिज्ञासूंचे अभिप्राय असे…!
१. आचार्य डॉ. तन्मयानंद, श्रीशक्तिन्यास, शक्ति विहार, श्रीकोणा बालेश्वर, ओडिशा – सनातन धर्म संस्कृतीचे शास्त्रीय परिभाषेतील प्रस्तुतीचे हे प्रदर्शन सनातन धर्मासाठी सुरक्षाकवच प्रदान करत आहे. आमच्या ओडिशातील आश्रमात याविषयी शिबीर आयोजित करू शकतो. आमच्या भागातील धर्मांतराच्या समस्यांच्या विरुद्ध आपण एकत्र कार्य करू शकतो.
२. श्री. विशाल दुबे, नवीन झुसी, प्रयागराज, उत्तरप्रदेश – मी हे प्रदर्शन पाहिल्यावर पुष्कळ प्रभावित झालो आहे. यात पुष्कळ छान माहिती आहे. मी स्वतः एक सनातनी असून आपल्या कार्यात सहभागी होऊ इच्छितो.
३. श्री. दिवाकर पांडेय, वाराणसी, उत्तरप्रदेश – हिंदूंना जागृत करण्यासाठी आवश्यक असलेले असे हे प्रदर्शन पाहिल्यावर मी आश्चर्यचकित झालो आहे. मी तन, मन आणि धन अर्पण करून आपल्या कार्यात सहभागी होऊ इच्छितो.
४. श्री आनंद महाराज हाळे, शिवभक्ती पारायण, नांदेड, महाराष्ट्र – सनातन संस्थेची ग्रंथसंपदा सर्वसामान्यांसाठी अत्यावश्यक आहे. हे ग्रंथ तळागळापर्यंत, तसेच प्रत्येक तालुक्यात पोचायला हवेत.