काशी विश्‍वनाथ मंदिराचे पक्षकार हरिहर पांडेय यांना धर्मांधाकडून ठार मारण्याची धमकी !

मंदिरावर अतिक्रमण करूनही धर्मांध हे हिंदूंना धमक्या देतात, यातून त्यांचा उद्दामपणा दिसून येतो !

काशी विश्‍वनाथ मंदिर, वाराणसी

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील काशी विश्‍वनाथ मंदिरासमोरील ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आणि उत्खनन करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर मंदिराचे पक्षकार हरिहर पांडेय यांना यासीन नावाच्या धर्मांधाकडून ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. यासीन याने धमकी देतांना म्हटले, ‘पांडेयजी तुम्ही खटला जिंकला असला, तरी पुरातत्व विभागवाले उत्खनन करण्याचा आदेश दिलेल्या परिसरात प्रवेश करू शकणार नाहीत. तुम्ही आणि तुमचे सहकारी मारले जाल.’ दूरभाषवरून देण्यात आलेल्या या धमकीची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आल्यानंतर पांडेय यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. पोलीस धमकी देणार्‍याचा शोध घेत आहेत.