उत्तरप्रदेशमध्ये पोलिसाकडून तरुणीवर बलात्कार

रक्षक नव्हे, भक्षक पोलीस ! अशा पोलिसांना तात्काळ अटक करून बडतर्फ करत कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – मैनपुरी जिल्ह्यामध्ये एका तरुणीवर चालत्या चारचाकी गाडीमध्ये पोलीस हवालदार धर्मेंद्र याने बलात्कार केला. कासगंज जिल्ह्यातील पटियाली पोलीस ठाण्यात हा हवालदार कार्यरत असून तो ओळखीचा असल्याचे या तरुणीने म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अन्वेषण करत आहेत.