बांगलादेशमध्ये मशिदीमध्ये नमाजपठण करणार्‍यांवर हिफाजत-ए-हिंदच्या आतंकवाद्यांचे आक्रमण : १२ लोक घायाळ

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील बायबांधा जिल्ह्यातील एका मशिदीमध्ये शुक्रवारचे नमाजपठण करण्यासाठी आलेल्या लोकांवर हिफाजत-ए-हिंद या जिहादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यात १२ हून अधिक जण घायाळ झाले. पोलिसांनी सांगितले की, मशीद समितीमधील वादामुळे ही घटना घडली. (इस्लामबहुल देशातील धर्मांध एकमेकांच्या विरोधात लढून हिंसाचार करतात, याचे उदाहरण ! – संपादक)