आगारातून सुटणार्‍या वस्तीच्या बसगाड्या त्वरित चालू करा ! – मंगेश तळवणेकर, माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती

सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथून सकाळी ६ वाजता सुटणारी साटेली, कोंडुरे, आरोस बाजार, रोणापाल, मडुरा, शेर्ला ते बांदा ही बसगाडी शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या तसेच गोरगरीब कामगार, छोटे-मोठे भाजी विक्रेते यांच्यासाठी चालू होती.

वर्ष २००८ च्या मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार जकी उर रहमान लखवी याला १५ वर्षांची शिक्षा

प्रत्यक्षात हे आतंकवादी मोकाटच फिरतात आणि त्यांच्या कारवाया चालू असतात, असे यापूर्वी आतंकवादी हाफिज सईद याच्या उदाहरणातून उघड झाले आहे !

स्वतंत्र ग्रामपंचायत मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील १२ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार !

१२ गावांतील गावकर्‍यांनी वारंवार मागणी करूनही स्वतंत्र ग्रामपंचायत सिद्ध न करणे हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद आहे.

मेळावली प्रकरणी ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे मनोज परब आणि रोहन कळंगुटकर यांना सशर्त जामीन संमत

मेळावली प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेले ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे (आर्.जी.) मनोज परब आणि रोहन कळंगुटकर यांना येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने १३ जानेवारी या दिवशी सशर्त जामीन संमत केला.

‘आंचिम’च्या जागतिक पॅनोरमा विभागात एकूण ५० चित्रपट प्रदर्शित होणार

१६ ते २४ जानेवारी या कालावधीत राजधानी पणजी शहरात होणार्‍या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आंचिम) जागतिक पॅनोरमा विभागात झळकणार्‍या चित्रपटांची सूची घोषित झाली आहे. यंदा जागतिक पॅनोरमा विभागात एकूण ५० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

सोलापूर येथील सिद्धेश्‍वर यात्रेतील अक्षता सोहळा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साधेपणाने

या सोहळ्यानिमित्त सम्मती कट्टा परिसर फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता. या वेळी पालखीचे पूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा या वर्षी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत आणि शासनाच्या नियमांचे पालन करत पार पडला.

काँग्रेसशासित राज्यांतील शेतकर्‍यांकडून होणारे आंदोलन कृषी कायद्याविरोधात नाही, तर सीएए, एन्.आर्.सी. आणि श्रीराममंदिराचे दुःख ! – साक्षी महाराज, खासदार, भाजप

उगाच आपला राग शांत करण्यासाठी कृषी कायद्यावरून आरडाओरड केला जाते, अशी टीका भाजपचे येथील खासदार साक्षी महाराज यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनावर केली.

तुर्कस्तानमधील १ सहस्र प्रेयसी असणार्‍या मुसलमान धर्मगुरूला लैंगिक शोषणाच्या प्रकरणी १ सहस्र ७५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

ख्रिस्त्यांच्या वासनांध पाद्रयांच्याही कितीतरी पाऊल पुढे असलेले धर्मांध धर्मगुरु ! हिंदूं संतांची नाहक अपकीर्ती करणारे आता कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत ?

प.पू. भक्तराज महाराज यांच्या पुणे येथील भक्त डॉ. (सौ.) पूजा जोशी यांचे दीर्घ आजाराने निधन

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे येथील भक्त कै. दत्तात्रय जोशी यांच्या सून डॉ. (सौ.) पूजा प्रशांत जोशी (वय ५६ वर्षे) यांचे ८ जानेवारी २०२१ या दिवशी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले.

चीनने लडाख सीमेवरून १० सहस्र सैनिक मागे घेतले !

चीनने लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून त्याच्या १० सहस्र  सैनिक मागे घेतले आहेत. भारतीय सीमेपासून हे सैनिक २०० कि.मी. मागे हटले आहेत.