गुळण्या करतांना हटकल्याने हत्येचा प्रयत्न !

पुणे – सिंहगड रस्ता भागात अल्पवयीन मुलाला गुळण्या करतांना हटकल्याने अल्पवयीनाने ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात दगड मारला. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १६ वर्षांच्या मुलाला कह्यात घेतले आहे. या प्रकरणी समीर चौधरी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

संपादकीय भूमिका 

तरुणांचा संयम संपल्याचे उदाहरण !