नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ
नवी मुंबई – नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर ५ ऑक्टोबरला विमानाच्या पहिल्या लँडिंगची चाचणी होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते अन् सिडकोचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांनी दिली. ‘या विमानतळावर ४ टर्मिनल आहेत. त्या ठिकाणी जवळपास ३५० विमाने एकाच वेळी उभी राहू शकतात’, असेही ते म्हणाले. नवी मुंबई विमानतळावर मेट्रोसह बुलेट ट्रेन, एक्सप्रेस वे, उपनगरीय रेल्वे, जलमार्ग यांची यंत्रणाही जोडण्यात येणार आहे. त्याचा फायदा ठाणे, कल्याण, पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील भारही अल्प होईल.