चीनने लडाख सीमेवरून १० सहस्र सैनिक मागे घेतले !

नवी देहली – चीनने लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून त्याच्या १० सहस्र  सैनिक मागे घेतले आहेत. भारतीय सीमेपासून हे सैनिक २०० कि.मी. मागे हटले आहेत. लडाखमध्ये सध्या प्रचंड थंडी असल्याने आणि तिचा सामना चिनी सैनिक करू शकले नसल्याने त्यांना परत नेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

गलवान खोर्‍यापासून पँगाँग त्सो तलावाच्या भागापर्यंत विविध ठिकाणी चीनने ५० सहस्र सैनिक तैनात केले होते. या भागात सध्या वजा १० अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. या तापमानात भारतीय सैनिकांनी तग धरली; मात्र चिनी सैनिकांना ही थंडी असह्य झाली.

( सौजन्य : इंडिया टुडे )