मिरज (जिल्हा सांगली), २४ सप्टेंबर (वार्ता.) – येथील छत्रपती शिवराय सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दिवंगत दामूअण्णा मोरेश्वर भट (मास्तर) स्मृती व्याख्यानमालेचे २७ सप्टेंबरपासून येथील ब्राह्मणपुरीमधील मुक्तांगण सभागृह, खरे मंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे हे १३ वे वर्ष आहे.
२७ सप्टेंबर या दिवशी ‘धुमसते ईशान्य भारत (पॉवरपॉईट प्रेझेंटेशन)’ या विषयावर पुणे येथील पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह श्री. जयवंत कोंडविलकर, मुंबई यांचे व्याख्यान होणार आहे. २८ सप्टेंबर या दिवशी ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ या विषयावर कोल्हापूर येथील वक्ते डॉ. अमर अडके यांचे व्याख्यान होणार आहे, तर २९ सप्टेंबर या दिवशी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरवगाथा’ या विषयावर वक्त्या सौ. विनिताताई तेलंग, सांगली यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सर्व व्याख्याने प्रतिदिन सायंकाळी ६.३० वाजता चालू होणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. केदार पटवर्धन, श्री. माधव बेटगेरी आणि श्रीमती सुरेखा ऐरसंग हे मान्यवर उपस्थित असतील. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती शिवराय सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.