Pawan Kalyan Criticises Prakash Raj : प्रत्‍येक हिंदूने धर्माचे दायित्‍व घेतले पाहिजे !

आंध्रप्रदेशाचे उपमुख्‍यमंत्री पवन कल्‍याण यांनी अभिनेते प्रकाश राज यांना फटकारले

अभिनेते प्रकाश राज व आंध्रप्रदेशाचे उपमुख्‍यमंत्री पवन कल्‍याण

अमरावती (आंध्रप्रदेश) – मी सनातन धर्माविषयी अतिशय गंभीर आहे. अनेक टीकाकारांनी स्‍वामी अयप्‍पा आणि देवी सरस्‍वती यांना लक्ष्य केले आहे. सनातन धर्माला पुष्‍कळ महत्त्व आहे. याविषयी प्रत्‍येक हिंदूने दायित्‍व घेतले पाहिजे. इतर धर्मातही असेच प्रश्‍न निर्माण झाले, तर व्‍यापक आंदोलन केले जाईल, अशा शब्‍दांत आंध्रप्रदेशाचे उपमुख्‍यमंत्री पवन कल्‍याण यांनी चित्रपट अभिनेते प्रकाश राज यांना फटकारले. तिरुपती बालाजी मंदिराच्‍या लाडूंच्‍या प्रकरणी प्रकाश राज यांनी ‘एक्‍स’वर पोस्‍ट करून ‘पवन कल्‍याण, कृपया चौकशी करून दोषींना शोधून कठोर कारवाई करा. तुम्‍ही भीती का पसरवत आहात आणि हे सूत्र राष्‍ट्रीय स्‍तरावर का मांडत आहात ? देशात आधीच पुरेसा धार्मिक तणाव आहे’ असे म्‍हटले होते.

पवन कल्‍याण म्‍हणाले की, मी हिंदु धर्माचे पावित्र्य आणि खाद्यपदार्थातील भेसळ या सूत्रांवर बोलत आहे. मी या विषयांवर का बोलू नये ? प्रकाश राज, मी तुमचा आदर करतो आणि जेव्‍हा धर्मनिरपेक्षतेचा विचार केला जातो, तेव्‍हा ती परस्‍पर असायला हवी. तुम्‍ही माझ्‍यावर टीका का करत आहात, हे समजत नाही. सनातन धर्मावरील आघातांच्‍या विरोधात मी बोलू नये का? प्रकाश यांनी धडा घ्‍यावा. चित्रपटसृष्‍टी आणि इतरांनी हे सूत्र हलक्‍यात घेऊ नये.

संपादकीय भूमिका

किती मंत्री हिंदु धर्माविषयी अशी भूमिका मांडतात आणि धर्मासाठी कृती करतात ?