Prophet Mohammad : पाकिस्‍तानात महंमद पैगंबरांचा अवमान करणारा मौलाना तारिक मसूद याची क्षमायाचना

तारिक मसूद पूर्वी स्‍वतः कुराणाचा अवमान करणार्‍यांना तात्‍काळा ठार करण्‍याची मागणी करत होता !

(मौलाना म्‍हणजे इस्‍लामचा अभ्‍यासक)

मौलाना तारिक मसूद

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – पाकिस्‍तानातील मौलाना तारिक मसूद याच्‍यावर ईश्‍वराची निंदा केल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे. यानंतर मसूद याने पलायन केले आहे. त्‍याने अलीकडेच कुराणावर वक्‍तव्‍य केले होते. त्‍यामुळे त्‍याच्‍यावर ईश्‍वरनिंदेचा आरोप करण्‍यात आला आहे. त्‍याने म्‍हटले होते, ‘ज्‍या व्‍यक्‍तीने (महंमद पैगंबर यांनी) कुराण सादर केले, तिने एक शब्‍दही लिहिला नाही. जेव्‍हा कुराणातील आयते (वाक्‍य) प्रकट होत असत, तेव्‍हा पैगंबर त्‍यांच्‍या अनुयायांना बोलावून त्‍यांना लिहायला सांगत. अशा प्रकारे कुराण इतर लोकांच्‍या साहाय्‍याने लिहिले गेले. पैगंबरांनी त्‍यात एक शब्‍दही लिहिला नाही; कारण महंमद पैगंबर यांना स्‍वत:ला लिहिता-वाचता येत नव्‍हते. त्‍यामुळे ते इतरांना लिहायला लावायचे. इतर लेखकांनी व्‍याकरणाच्‍या चुका केल्‍या. व्‍याकरणाची चूक कुठे आहे, हे ठाऊक नसल्‍यामुळे ती सुधारता आली नाही. आजही त्‍याच पद्धतीने कुराण लिहिले आहे.’ मौलानाच्‍या या वक्‍तव्‍यानंतर पाकिस्‍तानमधील मुसलमान संतप्‍त झाले आहे. यानंतर मौलाना तारिक मसूद याने एक व्‍हिडिओ प्रसारित करून या प्रकरणी क्षमायाचना केली आहे. मौलाना मसूद याने कुराणामध्‍ये अनेक त्रुटी असल्‍याचेही निदर्शनास आणून दिले होतो.

विशेष म्‍हणजे हाच मौलाना तारिक मसूद ईश्‍वराची निंदा करणार्‍यांना तात्‍काळ ठार मारण्‍याची भाषा करत असे. तसेच ‘कुणी या प्रकरणी क्षमा मागितली, तरी ती मनापासून आहे कि केवळ दिखाव्‍यासाठी आहे, हे आपण सांगू शकत नाही. त्‍यामुळे त्‍याला ईशनिंदा कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे’, असेही तो म्‍हणत असे.