तुर्कस्तानमधील १ सहस्र प्रेयसी असणार्‍या मुसलमान धर्मगुरूला लैंगिक शोषणाच्या प्रकरणी १ सहस्र ७५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

  • ख्रिस्त्यांच्या वासनांध पाद्रयांच्याही कितीतरी पाऊल पुढे असलेले धर्मांध धर्मगुरु !
  • हिंदूंच्या संतांची खोट्या आरोपांखाली नाहक अपकीर्ती करणारे आता कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत ?
अदनान ओकतारा

इस्तंबूल (तुर्कस्तान) – येथील एका न्यायालयाने लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, फसवणूक, राजकीय, तसेच सैनिकी हेरगिरी आदी १० प्रकरणांमध्ये मुसलमान धार्मिक नेता अदनान ओकतारा याला १ सहस्र ७५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याच्या २ कार्यकर्ते टरकान आणि ओकटार यांनाही शिक्षा सुनावली आहे. यात टरकान याला २११ वर्षे, तर ओकटार याला १८६ वर्षांच्या कारावासाची  शिक्षा सुनावण्यात आली आहे. (हास्यास्पद शिक्षा ! इतकी वर्षे माणूस जगू तरी शकतो का ? – संपादक) अदनान ऑनलाईन माध्यमामधून स्वत:ची एक धार्मिक वाहिनी चालवायचा. स्वतःच्या कार्यक्रमामध्ये तो जेव्हा मानवाच्या जन्माचे रहस्य आणि रुढीवादी विचारांच्या संदर्भातील उपदेश द्यायचा, तेव्हा त्याच्या आजूबाजूला अनेक तरुणी अर्धनग्नावस्थेत नाचतांना दिसायच्या.

१. अदनान ज्या महिलांचे लैंगिक शोषण करायचा त्यांच्यावर तो गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास भाग पाडायचा, असा दावा एका महिलेने न्यायालयात केला. अदनानच्या घरातून ६९ गर्भनिरोधक गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या.

तुर्कीने लैंगिक अत्याचार, इतर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या इस्लामिक धर्मगुरुला तुरूंगात टाकले

२. अदनान याने त्याच्या १ सहस्र प्रेयसी असल्याचे म्हटले होते. ‘महिलांविषयी मला पुष्कळ प्रेम आहे. प्रेम हा एक मानवी गुणधर्म असून प्रेम करणे हे मुसलमान व्यक्तीचे वैशिष्ट्य असते’, असे अदनानने न्यायालयासमोर म्हटले होते.