
सावंतवाडी – सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथून सकाळी ६ वाजता सुटणारी साटेली, कोंडुरे, आरोस बाजार, रोणापाल, मडुरा, शेर्ला ते बांदा ही बसगाडी शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या तसेच गोरगरीब कामगार, छोटे-मोठे भाजी विक्रेते यांच्यासाठी चालू होती. त्याचप्रमाणे सातार्डा-सातोसे मार्गे बांदा ही बसगाडीही बंद आहे अन् तसेच तालुक्यातील इतरही वस्तीच्या गाड्या बंद आहेत. कोरोना काळात दळणवळण बंदी होती. या बंद गाड्यांमुळे शाळकरी मुले, कामगार आणि गावठी भाजीपाला विक्रेते यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे. येत्या ८ दिवसांत या गाड्या सुरळीत चालू कराव्यात, अन्यथा सावंतवाडी आगारासमोर शाळकरी मुले तसेच सर्वसामान्य जनता यांना घेऊन उपोषण छेडण्यात येईल, अशी चेतावणी तळवणेकर यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. या वेळी येत्या २ ते ४ दिवसांत बसगाड्या चालू करण्याचे आश्वासन आगारप्रमुख पडोळे यांनी दिले.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र