‘आंचिम’च्या जागतिक पॅनोरमा विभागात एकूण ५० चित्रपट प्रदर्शित होणार

पणजी, १३ जानेवारी (वार्ता.) – १६ ते २४ जानेवारी या कालावधीत राजधानी पणजी शहरात होणार्‍या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आंचिम) जागतिक पॅनोरमा विभागात झळकणार्‍या चित्रपटांची सूची घोषित झाली आहे. यंदा जागतिक पॅनोरमा विभागात एकूण ५० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये जर्मनी येथील सर्वाधिक ८, फ्रान्समधील ६, तसेच अमेरिका, इटली, ग्री, नेदरलँड आदी देशांतील चित्रपटांचा समावेश आहे. जागतिक स्तरावर अभिनय आणि कला यांना योग्य व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी ‘आंचिम’ प्रयत्नशील आहे.

प्रसिद्ध चित्रपटनिर्माते सत्यजीत रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे चित्रपट प्रदर्शित करणार

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (आंचिम) प्रसिद्ध चित्रपटनिर्माते सत्यजीत रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यामध्ये ‘चारूलता’ (वर्ष १९६४), ‘घरे भरे’ (वर्ष १९८४), ‘पॅथर पंचाली’ (वर्ष १९५५), ‘सतरंज के खिलाडी’ (वर्ष १९७७) आणि ‘सोनार केली’ (वर्ष १९७४) या चित्रपटांचा समावेश आहे.