शिर्डी संस्थानकडून दर्शनासाठी नवीन नियमावली घोषित !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिर्डी संस्थानने नाताळच्या निमित्ताने साई दर्शनासाठी नवी नियमावली घोषित केली आहे.

२६ डिसेंबरला शिवसेनेची सांगली-तुळजापूर १६ वी आशीर्वाद यात्रा ! – हरिदास पडळकर, शिवसेना

ही यात्रा २६ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता सांगली येथील शिवतीर्थ, मारुति चौक येथून प्रारंभ होईल, अशी माहिती या यात्रेचे प्रमुख निमंत्रक आणि शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख श्री. हरिदास पडळकर यांनी दिली.

नेर्ली (जिल्हा सांगली) येथे आढळला सुमारे ७०० वर्षांपूर्वीचा वीरगळलेख ! – मिरज इतिहास मंडळाचे संशोधन

सांगली जिल्ह्यातील नेर्ली (तालुका कडेगाव) येथे सुमारे ७०० वर्षांपूर्वीचा वीरगळलेख आढळला आहे. मिरज इतिहास मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी हा लेख शोधला आहे.

तृणमूल काँग्रेसविरुद्ध आणि भाजपला मत दिले, तर रक्ताचे पाट वहातील ! – बंगालमध्ये भिंतीवर धमकी !

बंगालमध्ये लोकशाहीचे तीनतेरा वाजवण्यात आले आहेत, हेच या धमकीतून उघड होते. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती पहाता येथील सरकार विसर्जित करून राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर यांची यात्रा प्रतिकात्मक स्वरूपात साजरी होणार !

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेला १० जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. यंदा कोरोनामुळे कार्तिकी वारीच्या धर्तीवर श्री सिद्धरामेश्‍वरांची यात्राही प्रतिकात्मक स्वरूपात पार पाडावी, असा अभिप्राय पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी दिला आहे.

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील एका शाळेत शिकवला जातो जरासंधाने भगवान श्रीकृष्णला पराजित केल्याचा चुकीचा इतिहास !

चुकीचा इतिहास शिकवणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे !

निरोगी नागरिक ही शहराची खरी संपत्ती ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले

सर्वांनी आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवन जगावे; कारण निरोगी नागरिक ही शहराची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

किल्ले अजिंक्यतारा येथे १२ जानेवारी या दिवशी होणार सातारा नगरपालिकेची विशेष सभा

छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेकदिन म्हणजे १२ जानेवारी हा दिवस. वर्षीपासून प्रत्येक १२ जानेवारीला सातारा नगरपालिकेची विशेष सभा किल्ले अजिंक्यतारा येथील राजसदरेवर घेण्याची घोषणा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

३१ डिसेंबर हा उत्सव नसून एक दिवसाचे धर्मांतरच होय ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

पाश्‍चात्त्यांनी त्यांच्या आर्थिक आणि राजकीय स्वार्थासाठी हिंदूंना हिंदु संस्कृतीपासून दूर करण्याचे षड्यंत्र रचून हिंदूंचा वैभवशाली वारसा नष्ट केला. ३१ डिसेंबर हा उत्सव नसून एक दिवसाचे धर्मांतरच होय.

कोरोनाच्या आपत्काळात आनंद अनुभवता येणे, ही भगवंताची कृपाच ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

साधनेला प्रारंभ केल्यावर ईश्‍वराचे तत्त्व कसे कार्यरत होते, हे जिज्ञासूंनी त्यांना आलेल्या अनुभूतींच्या माध्यमातून अनुभवले.