श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी केवळ १ सहस्र ५०० भाविकांना दिला जाणार प्रवेश !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने केवळ १ सहस्र ५०० भाविकांनाच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

अजय गोसालिया यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याला १० वर्षांचा कारावास !

बांधकाम व्यावसायिक अजय गोसालिया यांच्यावर गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सी.बी.आय्. न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा आणि ५ लाख रुपये इतका दंड ठोठावला आहे.

राज्यात केवळ १० दिवस पुरेल इतकाच कोरोनावरील लसीचा साठा शिल्लक ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

साधारणपणे २ कोटी २० लाख डोस आपल्याला आवश्यक आहेत. येत्या ३ मासांत हे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. साधारण प्रती आठवड्याला २० लाख डोस आवश्यक आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद

सनातन संस्थेचा उद्देश ऐकून अनेक जिज्ञासू प्रभावित झाले. त्यांनी ‘सनातनचे कार्य  अतिशय चांगले असून ते हिंदु धर्मासाठी आवश्यक आहे’, असे सांगितले.

श्री जगन्नाथपुरी मंदिराची ३५ सहस्र एकर भूमीची ओडिशा सरकार विक्री करणार !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर आतापर्यंत जे होत आले आहे, तेच श्री जगन्नाथपुरी मंदिराच्या संदर्भात होत आहे ! अशा घटना रोखण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून सोडवून भक्तांना सोपवणे आवश्यक आहे अन्यथा मंदिरांची भूमी, संपत्ती सर्व काही सरकार विकून मोकळी होईल !

देशभरात एका मासामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत ६३ टक्क्यांची वाढ !

गेल्या २४ घंट्यांत कोरोनामुले १३१ लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या घटनांत महाराष्ट्र पुढे आहे.

जगभरातील सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांपैकी २२ शहरे भारतात !

देशातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हे रोखण्यासाठी आतापर्यंत काहीच न केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. देशातील सर्व प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !

सद्दाम हुसेन आणि गद्दाफी हेही निवडणुका जिंकत होते; पण तेथे लोकशाही होती, असे नाही ! – राहुल गांधी यांची केंद्रातील भाजप सरकारवर टीका

विदेशी विश्‍वविद्यालयाने ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘भारतात लोकशाही नाही’, असे चित्र उभे करून भारताची मानहानी करणारे राहुल गांधी !

रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत दर्गा आणि मशिदी येथे ध्वनीक्षेपक लावू नका ! – कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाचे परिपत्रक

नियमाचे पालन दर्गा आणि मशिदी करत नसतील, तर बोर्डाने अशांवर कारवाई करण्यास पोलिसांना सांगितले पाहिजे ! तसेच या नियमांचे पालन न करणारे दर्गे आणि मशिदी यांवर पोलीस कारवाई करत नसतील, अशा बहिर्‍या पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !

आगरा येथे मंदिर परिसरातच एका साधूंची कुर्‍हाडीने घाव घालून हत्या

उत्तरप्रदेशात साधूंच्या हत्यांचे सत्र चालूच ! भाजपच्या राज्यात सातत्याने अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर उपायोजना करून अशा घटना रोखल्या पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !