महाशिवरात्रीनिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद

सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये अध्यात्मप्रसार

प्रतिकात्मक छायाचित्र

वाराणसी – महाशिवरात्रीनिमित्त म्हणजेच ११ मार्च या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने बिहारमधील पाटणा, गया, समस्तीपूर आणि उत्तरप्रदेशमधील भदोही, गाझीपूर, वाराणसी, अयोध्या अन् सुलतानपूर येथे सनातनचे ग्रंथ, तसेच  उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनांना जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद मिळाला. शिवाशी संबंधित ग्रंथ आणि पूजनासंबंधित सात्त्विक उत्पादने जिज्ञासूंचे विशेष आकर्षण ठरले.

क्षणचित्रे

१. बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याला सनातनचे प्रदर्शन पाहून अतिशय आनंद झाला. त्याने लगेच सनातनच्या ग्रंथांचे वैशिष्ट्य सांगणारी ध्वनीचित्रफीत फेसबूकवर स्वतःहून प्रसारित केली. तसेच त्याने ७ ग्रंथ खरेदी केले.

२. एका धर्मप्रेमी वाचकांनी भगवान शिवाच्या २०० नामपट्ट्या खरेदी करून एका शोभायात्रेत प्रसाद रूपामध्ये वितरित केल्या.

३. सारंगनाथ मंदिरामध्ये एका वैद्याने औषधीविषयक ग्रंथांची मागणी केली. तसेच या ठिकाणी प्रदर्शन लावण्यासाठी लागणारे आवश्यक ते साहित्य एका हितचिंतकांनी उपलब्ध करून दिले.

४. वाराणसीमधील नटवा येथील एका धर्मप्रेमीने शिवाच्या नामजपाच्या १०० नामपट्ट्या खरेदी केल्या.

५. पाटणामधील कंकणबाग येथे लावण्यात आलेल्या प्रदर्शनामुळे मंदिर परिसराचे अध्यक्ष अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी स्वत:हून पुन्हा पुन्हा साधकांची विचारपूस केली आणि काही ग्रंथ खरेदी केले.

६. सनातन संस्थेचा उद्देश ऐकून अनेक जिज्ञासू प्रभावित झाले. त्यांनी ‘सनातनचे कार्य  अतिशय चांगले असून ते हिंदु धर्मासाठी आवश्यक आहे’, असे सांगितले.