उत्तरप्रदेशात साधूंच्या हत्यांचे सत्र चालूच !
भाजपच्या राज्यात सातत्याने अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर उपायोजना करून अशा घटना रोखल्या पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !
आगरा (उत्तरप्रदेश) – येथील यमुना नदीच्या किनारी असलेल्या जंगलातील हनुमान मंदिरामध्ये पूजा करणारे शिव गिरी या साधूंची अज्ञातांनी कुर्हाडीने वार करून हत्या केली. मंदिराच्या आवारात त्यांच्यावर आक्रमण करून ही हत्या करण्यात आली. शिव गिरी हे या मंदिराच्या आवारातच वास्तव्याला होते.
न्यू आगरा थाना क्षेत्र के मऊ गांव में एक साधू की हत्या की खबर मिली थी। शव को पोस्टमार्टम के लिए भेजा जा रहा है। मौके से कुल्हाड़ी भी बरामद हुई है जिससे हत्या की बात सामने आ रही है। मुकदमा दर्ज करके जांच की जाएगी। अभी कोई कारण सामने नहीं आया है: सिटी SP, आगरा, उत्तर प्रदेश pic.twitter.com/huxEW9o7hY
— ANI_HindiNews (@AHindinews) March 17, 2021
१७ मार्चला पहाटे काही स्थानिक लोकांनी पाहिले की, साधूंचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत मंदिराच्या आवारात पडून आहे. यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेवून मृतदेह कह्यात घेतला. या साधूंची हत्या कुणी केली आणि का केली ? याचा पोलीस शोध घेत आहेत. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली कुर्हाड जप्त करण्यात आली आहे. चोरी किंवा लुटमारी या हेतूने ही हत्या झाल्याचा कोणताही पुरावा पोलिसांना मिळालेला नाही. त्यामुळे कुणी तरी ओळखीच्या व्यक्तीने ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.