राज्यात केवळ १० दिवस पुरेल इतकाच कोरोनावरील लसीचा साठा शिल्लक ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राजेश टोपे

मुंबई – साधारणपणे २ कोटी २० लाख डोस आपल्याला आवश्यक आहेत. येत्या ३ मासांत हे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. साधारण प्रती आठवड्याला २० लाख डोस आवश्यक आहेत. नियमित ३ लाख लसीकरण करता येईल, या सरासरीनुसार राज्यात केवळ १० दिवस पुरेल इतकाच कोरोनावरील लसीचा साठा शिल्लक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. १७ मार्च या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली असल्याचे सांगितले.

या वेळी राजेश टोपे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी एकूण १ सहस्र ८८० केंद्रे संमत करण्यात आली आहेत. आतापर्यंत राज्यातील ३३ लाख ६५ सहस्र ९५२ नागरिकांना लस देण्यात आली आहे.’’