गोवा मांस प्रकल्पात हत्या करण्यासाठी शेजारच्या राज्यांतून पशू आणण्यास नोंदणीकृत दलालांना अनुमती ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

“३० टक्के लोकांसाठी आपल्याला हे करावे लागत आहे”, तर गोव्यातील ७० टक्के हिंदूंच्या भावनांचा तुम्ही कुठेच विचार करत नाही. यापुढे असे चालणार नाही.

कुलगाममध्ये २ आतंकवादी शरण

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोएबाच्या २ स्थानिक आतंकवाद्यांनी ‘त्यांच्या कुटुंबियांच्या आवाहनानंतर आत्मसमर्पण केले’, असे पोलिसांनी सांगितले.

स्वराज गोमंतक संस्थेकडून वेर्ला येथे महिलांसाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर

गोवा मुक्तीदिनाचे औचित्य साधून ‘स्वराज गोमंतक’ या संघटनेकडून समाजासाठी विशेषतः महिला आणि युवती यांच्यासाठी अनिवासी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. वेर्ला-काणका येथील सातेरीनगर क्रीडा मैदानात १६ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२० या कालावधीत हे शिबिर घेण्यात आले.

कोकण इतिहास परिषदेकडून ‘सौंधेकर राजघराण्याचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन

कोकण इतिहास परिषद, गोवा शाखेकडून ‘सौंधेकर राजघराण्याचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन नागेशी, बांदोडा येथील राजे सौंधेकर घराण्याच्या वाड्यात नुकतेच करण्यात आले.

आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार येथील आधुनिक वैद्यांसाठी ‘ऑनलाईन’ बैठक

आरोग्य क्षेत्रातील राष्ट्र आणि धर्म प्रेमी आधुनिक वैद्य अन् परिचारिका यांचे संघटन व्हावे, तसेच आरोग्य क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात वैध  मार्गाने कृती करण्यात यावी, या उद्देशाने आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने नुकतीच एक ‘ऑनलाईन’ बैठक आयोजित करण्यात आली.

मडगाव येथील मोतीडोंगरावर राजकीय वरदहस्ताने अवैध बांधकामे होत आहेत ! – परशुराम गोमंतक सेना

एका संघटनेला दिसते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाला का दिसत नाही ?

चिपी विमानतळाच्या नामकरणावरून वाद !

येत्या २६ जानेवारी २०२१ या दिवशी वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचे म्हटले जात आहे. याविषयी केंद्रस्तरावरून, तसेच स्थानिक नेतेही सांगत आहे. या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर या विमानतळाच्या नामकरणावरून नवा वाद चालू झाला आहे.

पाक सरकारकडून राजधानी इस्लामाबादमध्ये हिंदु मंदिर उभारण्याला अनुमती

पाक सरकारने केवळ अनुमती देऊन थांबू नये, तर त्याचे बांधकाम करतांना आणि मंदिर उभारल्यावरही त्या रक्षणासाठी कायमस्वरूपी सशस्त्र बंदोबस्त करावा, असेच हिंदूंना वाटते !

अमेरिकेतील विद्यापिठामध्ये हिंदु धर्म आणि जैन पंथ यांच्या अभ्यासासाठी पिठाची स्थापना !

अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये हिंदु धर्माविषयी अभ्यास केला जातो आणि त्यासाठी पिठाची स्थापना केली जाते. भारतात मात्र शाळांमध्ये गीता शिकवण्याचा निर्णय सरकारने घेतल्यावर कथित निधर्मीवादी, बुद्धीवादी आणि पुरोगामी याला विरोध करतात !

काश्मीरमध्ये भाजप प्रथमच जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत ३ जागांवर विजयी, तर ५४ ठिकाणी घेतली आघाडी !

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजपला प्रथमच ३ जागांवर विजय मिळाला आहे, तसेच यात ५४ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर गुपकर आघाडीचे उमेदवार ९५ जागांवर आघाडीवर आहेत.