म्हादईच्या उगमस्थानाच्या पहाणीनंतरच्या संयुक्त बैठकीत कर्नाटककडून संयुक्त पथकाला प्रभावित करण्याचा खटाटोप !

म्हादईच्या उगमस्थानाच्या पहाणीनंतरच्या संयुक्त बैठकीत कर्नाटककडून संयुक्त पथकाला प्रभावित करण्याचा खटाटोप करण्यात आला.

गृहमंत्री अनिल देशमुख यांना हटवण्याविषयी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ ! – शरद पवार

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये मागितल्याच्या परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली !

विशाळगडावरील अतिक्रमणाचे सूत्र गंभीर असून याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि जिल्हाधिकार्‍यांच्या समवेत बैठक घेऊ ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

जिल्हाधिकार्‍यांना सूचित करून सर्वांची एकत्रित बैठक घेऊन अतिक्रमण काढण्याविषयी जिल्हाधिकार्‍यांना योग्य ती पावले उचलण्यासाठी सांगणार, असे आश्‍वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिले.

पारंपरिक आणि अपारंपरिक पद्धतींनी केलेल्या संशोधनात अध्यात्म अन् वैद्यकशास्त्र यांचा थेट संबंध ! – शॉन क्लार्क

‘रोगांची कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांमधील अध्यात्मशास्त्राचे स्थान’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर !

वाई (जिल्हा सातारा) येथील तहसीलदारांचे आदेश धुडकावणार्‍या तलाठ्यांवर कारवाई !

तहसीलदारांनी तलाठी कुंभार यांना वाळू चोरीच्या ठिकाणी धाड टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार टाकलेल्या धाडीत चोरलेली वाळू आणि साहित्य कह्यात घेऊन पंचनामा करण्यात आला.

पुणे येथील खासगी अधिकोषाची ३६ लाखांची फसवणूक !

सायबर चोरीच्या वेगवेगळ्या घटना सतत घडत आहेत. यावरून त्यांच्यावर कुणाचा अंकुश नाही, असेच लक्षात येते. पोलिसांनी याच्या मुळाशी जाऊन अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करावेत !

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आशीर्वादानेच निलंबन रहित करून सचिन वाझे यांना महत्त्वाच्या पदावर घेतले ! – देवेंद्र फडणवीस

एखाद्या निलंबित व्यक्तीला काही कारणास्तव पुन्हा सेवेत घेतले, तर तिला महत्त्वाचे अधिकारीपद देता येत नाही, हे सरकारला माहिती नाही ? एवढेच नाही, तर सगळ्या महत्त्वाच्या केसेस त्यांच्याकडेच देण्यात आल्या, हे सरकारच्या आशीर्वादाविना झाले का ?…..

…‘तर जनतेचा विश्‍वास कायमचा उडून आपण अराजकतेच्या दिशेने जाऊ !’ – राज ठाकरे

या प्रकरणाचे राज्यात निष्पक्ष अन्वेषण होईल, याची मला मुळीच निश्‍चिती नाही. केंद्रशासनानेही नीट चौकशी केली नाही, तर मात्र जनतेचा विश्‍वास कायमचा उडेल आणि आपण अराजकतेच्या दिशेने जाऊ, अशी चिंता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे येथील सिनेमा, नाटक चालू; परंतु सांस्कृतिक कार्यक्रम रहित !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने सध्या नाट्यगृहांमध्ये तसेच मल्टिप्लेक्समध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने प्रयोग करण्यास अनुमती दिली आहे; परंतु त्याच जागी नियम पाळून सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रम तसेच व्याख्याने घेण्यास बंदी घातली आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक हिंदूने कृतीशील होणे, हीच स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना असेल ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे अखंड हिंदुस्थानचे प्रणेते, मातृभाषेचा अभिमान असलेले, राष्ट्रीय अस्मिता असलेले, दूरदर्शी, प्रतिभासंपन्न क्रांतीवीर साहित्यिक. साहित्यिकही अनेक असतात आणि क्रांतीकारकही अनेक होऊन गेले; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकारांसारखा क्रांतीवीर साहित्यिक हा ‘यासम हाच !’