श्री जोतिबा डोंगरावर कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने लाखाहून अधिक भाविक
कार्तिक पौर्णिमेनिमित्त पन्हाळा तालुक्यातील श्री जोतिबा डोंगरावर श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक येथून लाखाहून अधिक भाविक आले होते. यामुळे डोंगरावर यात्रेचेच स्वरूप प्राप्त झाले होते. ‘चांगभल’च्या घोषणेने डोंगर दणाणून गेला.