मुंबई – पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची विदेशी चलन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात आली आहे. १० घंटे ही चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. याविषयी अंमलबजावणी संचालनालयाने अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगितलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार अंमलबजावणी संचालनालयाने पुण्यात अविनाश भोसले यांच्या काही ठिकाणांवर छापे मारले होते.विदेशी चलन प्रकरणात फेमा कायद्यांतर्गत भोसले यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांच्याकडील कागदपत्रांचीही छाननी करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले आहे.