निधन वार्ता

जिल्ह्यातील कांदिवली येथील सनातनच्या साधिका सौ. अनिता विनय शहाणे यांचे पती विनय वसंत शहाणे (वय ५८ वर्षे) यांचे २३ नोव्हेंबरला रात्री दीर्घकालीन आजाराने निधन झाले.

सिंधुदुर्गात १२ नवीन कोरोनाबाधित

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४० झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विजेच्या प्रश्‍नांचा खेळखंडोबा ! – देवेंद्र फडणवीस

विजेचा वापर न करता सावकारी पद्धतीने जनतेकडून चौपट वीजदेयक वसुली केली जात आहे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

सिंधुदुर्गनगरी येथे एका पोलिसाच्या घरातून दुसर्‍या पोलिसाच्या मुलानेच केली दागिन्यांची चोरी

पोलीस वसाहतीत रहाणार्‍या ओंकार राजू माळगे याला अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला.

पाकिस्तानच्या विरोधातील संतप्त निदर्शनात पाकच्या ध्वजाची होळी

करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने हुतात्मा सैनिक संग्राम पाटील आणि ऋषिकेश जोंधळे यांना श्रद्धांजली

तमिळनाडूमध्ये हिंदु महासभेच्या नेत्याची अज्ञातांकडून घराबाहेर हत्या

काही मासांपूर्वी पोलिसांनी सुरक्षेची मागणी फेटाळली होती ! देशात हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्‍या हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

देहलीमध्ये बुरखाधारी महिलेकडून दुकानदाराशी झालेल्या वादातून गोळीबार !

एका बुरखाधारी धर्मांध महिलेकडेही आता पिस्तुले असतात आणि ती गोळीबार करते !

ओवैसी विकास नाही, तर रोहिंग्यांना भारतात आणण्याची मागणी करतात ! – खासदार तेजस्वी सूर्या, अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

ओवैसी हे महंमद अली जीना यांच्याप्रमाणे  इस्लामवाद, फुटीरतावाद आणि कट्टरतावाद यांची भाषा बोलत आहेत. देशातील प्रत्येकाने ओवैसी यांच्या फुटीरतावादी आणि धार्मिक राजकारणाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावरच कठोर कायदा करावा ! – हिंदु जनजागृती समिती

मुळात हिंदु संघटनांना अशी मागणीच करावी लागू नये. केंद्र सरकारने स्वतःहून हा कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

३० सहस्र रोहिंग्यांची मतदार सूचीमध्ये नोंद होईपर्यंत अमित शहा झोपा काढत होते का ? – असदुद्दीन ओवैसी यांचे तेजस्वी सूर्या यांना प्रत्युत्तर

जर तुम्ही ३० सहस्र रोहिंग्यांची मतदारसूचीत नोंद असल्याचे सांगत आहात, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एवढे सगळे होईपर्यंत झोपा काढत होते का ?, असा प्रश्‍न एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांच्या टीकेवर केला आहे.