देहलीमध्ये बुरखाधारी महिलेकडून दुकानदाराशी झालेल्या वादातून गोळीबार !

एका बुरखाधारी धर्मांध महिलेकडेही आता पिस्तुले असतात आणि ती गोळीबार करते !  यातून धर्मांध महिलांचीही शस्त्रसज्जता लक्षात येते ! याविषयी निधर्मीवादी तोंड उघडतील का ?

नवी देहली – ईशान्य देहलीतील चौहान बांगर परिसरात एका बुरखाधारी धर्मांध महिलेने दुकानाच्या शटरवर गोळ्या झाडल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. गोळीबार करतांना ही महिला दुकानदाराला शिवीगाळ करत असून ‘मी गुंड नासिरची बहीण आहे’, असे ओरडत सांगत आहे. गोळीबार करून  ही महिला पसार झाली. या गोळीबारात कुणीही घायाळ झाले नाही. पोलिसांनी नंतर या महिलेला अटक केली आहे.

१. पोलिसांनी सांगितले की, ही घटना १८ नोव्हेंबरला रात्री घडली. ही महिला दारूच्या नशेत होती आणि भ्रमणभाष संच दुरुस्त करण्यावरून तिचा दुकानदाराशी वाद झाला. त्यातून तिने गोळीबार केला.

२. पोलिसांनी या महिलेला जाफराबाद परिसरातून अटक केली. तिचे नाव नुसरत असून ती जाफराबाद येथील रहिवासी आहे. ती मोहसिनची बहीण असून तो त्या भागातील नासिर टोळीतील गुंड आहे. या महिलेकडे पिस्तूल कसे आले, याविषयी पोलीस चौकशी करत आहेत.