नाशिक येथे विनाकारण दुचाकी रस्त्यांवर आणल्यास पुढील ३ मासांसाठी दुचाकी जप्त होणार

दळणवळण बंदीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात वारंवार सांगूनही दुचाकींचा वापर सर्रास चालूच असल्यामुळे आता विनाकारण कोणी दुचाकी रस्त्यांवर आणल्यास पुढील ३ मासांकरिता दुचाकी जप्त होणार आहे.

हिंगोली येथील कोरोना संशयित आधुनिक वैद्याचा अहवाल ‘निगेटिव्ह’

हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात भरती झालेल्या कोरोना संशयित एका आधुनिक वैद्याचा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविलेला अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे.

देशातील सर्व नागरिकांनी आर्थिक साहाय्य करावे ! – पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘देशातील सर्व वर्गातील नागरिकांनी ‘पी.एम्.-केअर्स’मध्ये (पंतप्रधान साहाय्यता निधीमध्ये) निधी जमा करावा.

विदेशांतून आलेल्या सर्वांची पडताळणी झालीच नाही ! – मंत्रीमंडळ सचिव राजीव गऊबा

गेल्या २ मासांत विदेशांतून १५ लाख नागरिक भारतात आले; पण सर्वांची कोरोनाची पडताळणी झालेली नाही. कोरोनाची पडताळणी केलेल्यांचा अहवाल आणि एकूण प्रवाशांची संख्या यांत मोठी तफावत आहे, अशी माहिती मंत्रीमंडळ (कॅबिनेट) सचिव राजीव गऊबा यांनी दिली.

भारतात आतापर्यंत ९३३ जणांना कोरोनाची लागण, तर २० जणांचा मृत्यू

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ९३३ झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे बँक खातेदारांनी १५ दिवसांत काढले ५३ सहस्र कोटी रुपये !

कोरोनामुळे देशात दळणवळण बंदी लागू केल्यामुळे बँकांकडून ए.टी.एम्.मध्ये रोख भरणा वेळेवर केला जाईल कि नाही, अशी भीती बँक खातेदारांच्या मनात आहे. याचसमवेत बँकांनी कामकाजाचा कालावधीही न्यून केला आहे.

कल्याण येथे शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक परिचारिकेकडून होणारा बायबलचा प्रचार हिंदुत्वनिष्ठांंनी थांबवला !

प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या वृत्तीचे धर्मांध ख्रिस्ती ! अशांवर कारवाई करणे अपेक्षित ! पूर्व भागातील नेतीवली येथे असलेल्या शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक असलेल्या परिचारिकेकडून रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना ‘नवा करार’ची (बायबलची) प्रत देऊन ख्रिस्ती पंथाचा प्रचार केला जात होता.

शिवसेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पोलिसांना चहापान

जिवाचे रान करून सेवा बजावणार्‍या उचगाव फाटा, उचगाव ‘हायवे ब्रीज’, तावडे हॉटेल चौक परिसरातील कामावर असणार्‍या पोलिसांना, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना शिवसेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चहापान देण्यात आले.

शेतीसाठी तातडीने अर्थसाहाय्य करणे आवश्यक ! – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रशासनाने विविध क्षेत्रांना अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र शेतीसाठी घोषित केलेले अर्थसाहाय्य पुरेसे नाही.

आठवडा बाजारासाठी सांगलीहून आलेल्या भाजी व्यापार्‍यांना रत्नागिरीतील नागरिकांनी रोखले !

जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला राज्यशासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे सांगलीहून काही व्यापारी भाजी विक्रीसाठी रत्नागिरीत आले; मात्र रत्नागिरीकरांनी त्यांना भाजी विक्री करण्यापासून रोखले. ‘सांगली जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या वाढल्यामुळे तेथून येणार्‍या नागरिकांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव