भारतात आतापर्यंत ९३३ जणांना कोरोनाची लागण, तर २० जणांचा मृत्यू

नवी देहली – देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ९३३ झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ घंट्यांत देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून त्यांची संख्या ९४ वर पोचली आहे. यांपैकी ७५ हून अधिक जणांना बरे वाटू लागल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.