रत्नागिरी – जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला राज्यशासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे सांगलीहून काही व्यापारी भाजी विक्रीसाठी रत्नागिरीत आले; मात्र रत्नागिरीकरांनी त्यांना भाजी विक्री करण्यापासून रोखले. ‘सांगली जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या वाढल्यामुळे तेथून येणार्या नागरिकांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो’, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाल्याने रत्नागिरीकरांनी सांगलीच्या भाजी व्यापार्यांना रोखले.
रत्नागिरीला भाजीपाला, दूध आदी जीवनावश्यक वस्तू घाटमाथ्यावरून (कोल्हापूर, सांगली येथून) येतात. त्यामुळे रत्नागिरीकरांनी भाजी व्यापार्यांना विरोध केला, तरी त्याचा मोठा परिणाम अंतिमतः त्यांच्यावरच होऊ शकतो. त्यामुळे याविषयी प्रशासन काय भूमिका घेणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष आहे.