
नवी देहली – कोरोनामुळे देशात दळणवळण बंदी लागू केल्यामुळे बँकांकडून ए.टी.एम्.मध्ये रोख भरणा वेळेवर केला जाईल कि नाही, अशी भीती बँक खातेदारांच्या मनात आहे. याचसमवेत बँकांनी कामकाजाचा कालावधीही न्यून केला आहे. त्यामुळे भीतीमुळे खातेदारांनी गेल्या १५ दिवसांत बँकांतून तब्बल ५३ सहस्र कोटी काढले असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून पुढे आली. बँकांमधून काढण्यात आलेली ही रक्कम गेल्या १६ मासांतील उच्चांकी रक्कम ठरली आहे. दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक रोख रकमेलाच पसंती देत असल्याने त्यांनी खात्यातून पैसे काढण्यास प्राधान्य दिल्याचे सांगितले जात आहे.
UDISE Plus Report : देशभरात प्रतिदिन सरासरी १३ शाळा होतात बंद !
देशातील शाळांमध्ये ५ सहस्रांची घट, तर सरकारी शाळांच्या तुलनेत खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाढ
जुन्या बँक खात्यांमधील पडून राहिलेले पैसे परत मिळवा ! – भारतीय रिझर्व्ह बँक
कर्नाटक शासन मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी करणार सर्वेक्षण ! : Deputy CM Dr. G. Parameshwara
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखडा : प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?