कोरोना विषाणूशी लढण्यासाठी भारत सिद्ध करणार ‘हजमत सूट’ !

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणार्‍या भारतातील डॉक्टरांसाठी संरक्षक कवच म्हणून ‘हजमत सूट’ (पोशाख) देशातच सिद्ध करण्यात येणार आहे. सध्या अनेक देशांत या पोशाखाचा वापर केला जातो. ‘इबोला’, ‘कोरोना’ यांसारख्या विषाणूंचे संक्रमण झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे आधुनिक वैद्य आणि…

देशात आतापर्यंत १ सहस्र ४० जणांना कोरोनाची लागण

देशभरात आतापर्यंत १ सहस्र ४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय कोरोनामुळे आतापर्यंत एकूण २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आत्मबळ वाढवण्याची आवश्यकता  ! – श्री श्री रविशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंग

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आत्मबळ वाढवण्याची आवश्यकता आहे. मनात भीती निर्माण झाली, तर रोगप्रतिकारशक्ती न्यून होते. त्यामुळे आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

राज्यातील १४ जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना स्वस्त धान्य उपलब्ध

या योजनेच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाडा येथील शेतकर्‍यांना एप्रिल, मे आणि जून २०२० या ३ मासांकरिता सवलतीच्या दरात गहू आणि तांदूळ प्रतिव्यक्ती ५ किलो उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

नाशिक येथे विनाकारण दुचाकी रस्त्यांवर आणल्यास पुढील ३ मासांसाठी दुचाकी जप्त होणार

दळणवळण बंदीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात वारंवार सांगूनही दुचाकींचा वापर सर्रास चालूच असल्यामुळे आता विनाकारण कोणी दुचाकी रस्त्यांवर आणल्यास पुढील ३ मासांकरिता दुचाकी जप्त होणार आहे.

हिंगोली येथील कोरोना संशयित आधुनिक वैद्याचा अहवाल ‘निगेटिव्ह’

हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात भरती झालेल्या कोरोना संशयित एका आधुनिक वैद्याचा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविलेला अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे.

देशातील सर्व नागरिकांनी आर्थिक साहाय्य करावे ! – पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘देशातील सर्व वर्गातील नागरिकांनी ‘पी.एम्.-केअर्स’मध्ये (पंतप्रधान साहाय्यता निधीमध्ये) निधी जमा करावा.

विदेशांतून आलेल्या सर्वांची पडताळणी झालीच नाही ! – मंत्रीमंडळ सचिव राजीव गऊबा

गेल्या २ मासांत विदेशांतून १५ लाख नागरिक भारतात आले; पण सर्वांची कोरोनाची पडताळणी झालेली नाही. कोरोनाची पडताळणी केलेल्यांचा अहवाल आणि एकूण प्रवाशांची संख्या यांत मोठी तफावत आहे, अशी माहिती मंत्रीमंडळ (कॅबिनेट) सचिव राजीव गऊबा यांनी दिली.

भारतात आतापर्यंत ९३३ जणांना कोरोनाची लागण, तर २० जणांचा मृत्यू

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ९३३ झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे बँक खातेदारांनी १५ दिवसांत काढले ५३ सहस्र कोटी रुपये !

कोरोनामुळे देशात दळणवळण बंदी लागू केल्यामुळे बँकांकडून ए.टी.एम्.मध्ये रोख भरणा वेळेवर केला जाईल कि नाही, अशी भीती बँक खातेदारांच्या मनात आहे. याचसमवेत बँकांनी कामकाजाचा कालावधीही न्यून केला आहे.