देशातील सर्व नागरिकांनी आर्थिक साहाय्य करावे ! – पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘देशातील सर्व वर्गातील नागरिकांनी ‘पी.एम्.-केअर्स’मध्ये (पंतप्रधान साहाय्यता निधीमध्ये) निधी जमा करावा. या निधीमध्ये छोट्यातील छोटे योगदानदेखील स्वीकारण्यात येणार आहे’, असे ट्वीट करत आवाहन केले आहे. ‘जनतेतून आलेल्या या आर्थिक साहाय्याचा उपयोग पुढील काळातील अडचणींवर मात करण्यासाठी होईल. तसेच नागरिकांच्या संरक्षणाविषयीच्या संशोधनासाठीही या निधीतून मोठे साहाय्य मिळणार आहे’, असेही त्यांनी त्यात म्हटले आहे. या ट्वीटमध्ये या निधीविषयी तपशील सांगणारी एक ‘लिंक’ही प्रसारित केली आहे.